Saturday, October 31, 2020
Home आरोग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती सदभावना; शक्य ती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती सदभावना; शक्य ती मदत पोहचवण्याचे आश्वासन

Raigad:

रायगड (Raigad) मधील महाड (Mahad) मध्ये तारिक गार्डन (Tariq Garden ) इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेने काल संध्याकाळी गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरम्यान 45-50 जणांच्या कुटुंबातील रहिवाशी इमारतीच्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील घेतली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना ज्या कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत त्यांच्याप्रती श्रद्धांजली तर जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना. स्थानिक संस्था आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल आहे. शक्य ती सारी मदत केली जाईल. असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दुर्घटनेची दखल घेतली आहे. जखमींना मदत करण्याचे आणि एनडीआरएफच्या टीम पाठवण्याचे ट्वीट करून सांगितले होते. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील महाड दुर्घटनेमध्ये जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे असं आवाहन करत मृतांसाठी, जखमींसाठी प्रार्थना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments