सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मादक पदार्थांची गोष्ट उघडकीस आल्यानंतर दुसर्याच दिवशी भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे बुधवारी ‘बॉलिवूड कार्टेल’ च्या कथित सहभागाबद्दल बोलले. ट्विटरवर स्वामींनी पुन्हा सांगितले की बॉलिवूड अभिनेत्याची हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांनी दुबई तील काही लोकांच्या सहभाग असले बद्दल त्या ट्विट मध्ये उल्लेख केला आहे.
“१ तारखेला (जुलै) मी सुशांतचा खून झाल्याचे म्हटले होते, सीबीआय चौकशी सुरू केली पाहिजे कारण मुंबई पोलिस गुन्हेगार होते आणि दुबई तील लोक त्यात सामील आहेत. आता बॉलिवूड कार्टेलची ओळख पटली गेली पाहिजे. ” स्वामी यांनी आज ट्विट केले.
सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर अनेक लोकांमधील व्हॉट्स ऍप्प चॅट समोर आल्या नंतर एका दिवसात हि गोष्ट घडली . सदर चॅट्स मुळे रियाचा प्रतिबंधित औषधांशी /मादक पदार्थांशी संबंध दिसून येतो.
रिया सुशांतची मैत्रीण होती आणि तिच्यावर बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी आरोप केले होते. रिया, तिच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि बर्याच जणांवर अभिनेत्याच्या कुटूंबाने सुशांतची आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.