उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतून लोकांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी पंजाबमध्ये कथित आंतरराज्यीय सायबर क्राइम गॅंग च्या एका सदस्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अनेक एटीएम कार्ड व मोबाईल फोन जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी गगन शर्मा हे आपले वीज बिल भरण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या बँक खात्यातून २.२० लाख रुपये चोरल्याची तक्रार दिल्यानंतर गुरु देव सिंह यांला बुधवारी मुझफ्फरनगर पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.
त्यानंतर याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर सेल प्रभारी संजीव भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे बिहार व झारखंडमधील साथीदारांशी संबंध आहेत. पोलिसांनी सीपीयू, चार मोबाइल फोन आणि वेगवेगळ्या बँकांचे अनेक एटीएम कार्ड तसेच इतर कागदपत्रांशिवाय २७,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत.