काही लोकांची सवय हि वेगळीच असते’. त्याचे हे उत्तम उदारहण.
दर आठवड्यात तेच क्रमांक घेऊन लॉटरी खेळणारी ऑस्ट्रेलियन महिला म्हणाली की तिने सहा वर्षांत प्रथमच आपले क्रमांक बदलले आणि १.८ दशलक्षचा जॅकपॉट मिळविला.
पेनरिथ, न्यू साउथ वेल्स येथील महिलेने लॉट अधिकाऱ्यांना सांगितले की ती कित्येक वर्षांपासून दर आठवड्याला शनिवारी लोट्टो खेळत आहे.
“मी दर आठवड्यात शनिवार लोट्टो खेळत आहे आणि मी सहा वर्षांपासून तेच नंबर लावत आहे,” असे त्या महिलेने सांगितले. त्या म्हणाल्या कि “तुमचा यावर विश्वास बसणार नाही, एका आठवड्यापूर्वी जेव्हा मी इतकी वर्षं खेळत असलेल्या क्रमांकात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच मला जॅकपॉट मिळाला.”
जॅकपॉट जिंकण्यासाठी खेळाडूने ऑनलाईन खरेदी केले होते. विजेत्याने सांगितले की ती तिच्या योजना आखत आहे आणि ठरवत आहे कि जिंकलेल्या रकमेचा वापर कसा करायचा.
ती म्हणाली, “मनातली पहिली गोष्ट म्हणजे आता घर भाड्याने घेण्याची गरज नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला स्वतःचे घर मिळवणे म्हणजे सर्वकाही असेल.”
“आम्हाला एक नवीन कार देखील आवडली आहे आणि आम्ही आमच्या मुलांना मदत करू,” असे विजेत्याने सांगितले.