गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. सादर वाहतूक एका ट्रक मधून होत असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी निपाणी येथे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुरगूड निपाणी मार्गावर पाळत ठेवली होती.
पोलीस वाहन तपासणी करत असताना, त्यांना एका दहा चाकी लॉरी वर संशय आला. अधिक तपास केला असता सादर लॉरी मधून विटा वाहतूक करणेचा नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात होती. विटांच्या आड बॉक्स लपवले होते. पोलिसाने सादर लॉरी मधून रॉयल ब्लू नामक दारूचे सहाशे बॉक्स जप्त केले. सादर मालाची किंमत १५ लाख होत आहे. त्याच बरोबर मध्य प्रदेश येथील दोन आरोपीना पोलिसांना अटक केली.