आरोग्याच्या मुद्द्यांवरून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे आपला राजीनामा जाहीर करणार आहेत, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी शुक्रवारी दिली.
“आबे यांचा आजार अधिकच बळावला सल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा विचार केला आणि त्यांना काळजी होती की यामुळे देशाचे नेतृत्व करण्यास अडचणी येतील”, असे राष्ट्रीय प्रसारक एनएचकेने एका स्रोताचा हवाला न देता सांगितले.
पंतप्रधानांच्या तब्येतीविषयी अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू होती.