Thursday, October 29, 2020
Home महाराष्ट्र प्रेमसंबंधातुन संशय घेवून मित्राचा गळा आवळून खुन

प्रेमसंबंधातुन संशय घेवून मित्राचा गळा आवळून खुन

प्रेमसंबंधातुन संशय घेवून मित्राचा गळा आवळून खुन. हा धक्कादायक प्रकार बोईसर येथे घडला. एक युवक काही दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह परिसरात सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांची सादर प्रकरणात २ आरोपीना शिताफीने अटक केली आहे. एक आरोपी तर पोलिसाने मदत करण्याचा बनाव करत होता.

बोईसर येथील अवधनगर येथे राहणाऱ्या शिवरत्न रॉय (उर्फ शिवम) ला शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर त्याला त्यांचा मित्र अबुझर सिद्धीकी याने कॉल करून बाहेर बोलवून घेतले होते. त्यामुळे गडबडीत घरात काहीही न सांगता शिवम रॉय त्यांना भेटण्यास गेला. त्या रात्री पासून त्या काही पत्ता लागत नव्हता. पण अचानक शिवम चा मृतदेह बुधवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी तारापूर येथे असलेल्या गंगोत्री हॉटेल समोरील मैदानात आढळून आला.

पोलीस तपासात त्याचा खून अबुझर सिद्धीकी व आरिफ खान यांनी गळा आवळून खून केला. शिवम ला कॉल करून आरोपी अबुझर सिद्धीकी (वय 19) याने बाहेर बोलवून घेतले नंतर , आरोपी त्याला घेऊन एका मोकळ्या मैदानात गेले. तिथे त्या दोघांनी शिवम चा गाला आवळून खून केला. शिवमचा मृतदेह त्यांनी जवळच्या झाडीत फेकून दिला व आरोपी निघून गेले. त्यापैकी एक आरोपी शिवम च्या परिवारासोबत पोलिसांना मदत करण्याचे नाटक करत होता. पण शेवटी सत्य समोर आले आणि पोलिसांनि अबुझर सिद्धीकी व आरिफ खान याना शिवम च्या खूनाच्या आरोपाखाली अटक केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बँकामध्ये मेगा भरती जाहीर

आय बी पी एस या संस्थेच्या माध्यमातून बँकामध्ये एकूण १५५७ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. एकूण जागा: १५५७...

सेन्सेक्स आज पुन्हा वरच्या दिशेला !

कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या...

PUBG वर केंद्र सरकारने घातली बंदी !

PUBG वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच सोबत इतर ११८ चीनी एप्स वर हि बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी हि बंदी...

सेन्सेक्सच्या घोडदौडीला आज लगाम !

बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी...

Recent Comments