बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० निर्देशांकांनी बँकिंग समभागांच्या जोरावर आज पुन्हा तेजी दाखवली. सेन्सेक्स ४६६ अंकांपर्यंत वधारला तर निफ्टी ५० निर्देशांक इंट्राडे ११,६८६ च्या उच्चांकावर पोहोचला. आजच्या वाढीसह सेन्सेक्स आणि निफ्टी सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले.
दुपार पर्यंत सेन्सेक्स ३१८ अंकांनी वधारून ३९,४३१ व निफ्टी 50 निर्देशांक ९६ अंक किंवा ०.८ टक्क्यांनी वधारत ११६५६ वर पोहोचला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज – निफ्टी बँक – निर्देशांक ३ टक्क्यांनी किंवा ७०० अंकांनी वाढून २४,3१० वर बंद झाला आहे. आर्थिक सेवा, सरकारी बँका , मीडिया आणि मेटल शेअर्समध्येही खरेदी वाढली.
दुसरीकडे, ऑटो शेअर्समध्ये सौम्य विक्रीचा दबाव होता.
निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.८५ टक्क्यांनी वधारला तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारला.
निफ्टी मध्ये ऍक्सिस बँक सर्वात जास्त वधारला आणि ५०६ रुपयावर आला. भारती इन्फ्राटेल, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज, यूपीएल, स्टेट बँक ऑफ इंडिया, झी एंटरटेनमेंट, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि सन फार्मा यांच्यात तेजी वाढली.
दुसऱ्या बाजूला पडणाऱ्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज लॅब, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकी यांचा समावेश आहे.