बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक आज सकाळी, आजच्या इंट्रा डे उच्चांकातून १३०५ अंकांनी घसरला आणि दुपारच्या व्यवहारातील घसरणीमुळे, ३८७०४ वर पोहोचला. दिवसातील पहिल्या भागातील कामकाजात निफ्टी ११७९४ वर पोहोचला.
सेन्सेक्स दिवसअखेर ८३९.०२ अंकांनी किंवा २.१३ टक्क्यांनी घसरुन, ३८६२८.२९ वर बंद झाला आणि निफ्टी २६० अंक म्हणजेच २.२३ – टक्क्यांनी खाली ११३८७.५० वर बंद झाला.
शनिवारी रात्री चीनच्या सैन्याने पांगोंग त्सो तलावाजवळ “स्थितीत बदल करण्यासाठी चिथावणी देणारी लष्करी हालचाली” केल्याचे सांगताच बाजारात हालचाल सुरु झाली आणि नफेखोरी दिसून आली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या एका सर्वेक्षणानुसार ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची १८.३ टक्के घसरण होईल असा अंदाज अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोविड -१९ मुले झालेल्या नुकसानाची संपूर्णपणे आकडेवारी घेतली जाईल, कारण देशात प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या उत्तरार्धात सरकार द्वारा लादलेले निर्बंध कमी करणे सुरूच आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत देशाच्या जीडीपीत 3.1 टक्के वाढ झाली आहे.