कोविड -१९ मधील वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई बाजारामध्ये कमकुवतपणा आढळून आला आणि देशांतर्गत शेअर बाजारांनी आज सुस्त सुरुवात केली.
बीएसई सेन्सेक्स ३८८१८ आणि, ३८९९१ च्या श्रेणीत राहिला. एनएसईचा निफ्टी बेंचमार्क ११५०६ ते ११४४९ च्या श्रेणीत राहिला. आयटी, फार्मास्युटिकल्स आणि कंझुमर गुड्स हे नफ्याच्या बाजूने होते तसेच आर्थिक आणि वाहन कंपन्यांनी तोटा दाखवून समतोल साधला.
सेन्सेक्स ३९०८६ वर बंद झाला तर निफ्टी ११५३५ वर बंद झाला.
डॉलर च्या तुलनेत रुपयाचा भाव ७३.५७ रुपये होता.
दिवसभरात झी एंटरटेनमेंट, भारती इन्फ्राटेल,अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो आणि ओएनजीसीच्या यांनी १.३२ ते ३.४२ टक्क्यांच्या फायदा दाखवला.
दुसरीकडे ग्रॅसिम, एसबीआय, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि टायटन या कंपन्यांना निफ्टी मध्ये सर्वाधिक फटका बसला. त्यांच्या मध्ये ०.८० ते १.८६ टक्क्यांनी घसरण झाली.
या आठवड्यात अधिकृत आकडेवारीत असे दिसून आले आहे की जूनच्या तिमाहीत देशाच्या जी डी पी मध्ये -२३.९ टक्के घसरण झाली आहे.